Cherreads

Chapter 1 - माझ्या आयुष्यातील काळा दिवस 14 फेब्रुवारी 2021:माझ्या आईला झालेला पॅलेस

सर्वांसाठी 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस असतो पण माझ्यासाठी तो दिवस काळा दिवस म्हणून ठरला कारण त्या दिवशी मी ज्या गोष्टीचा विचार सुद्धा केला नव्हता ती गोष्ट त्या दिवशी झाली 13 फेब्रुवारीला माझी आई खूप खुश होती कारण तिला 14 फेब्रुवारीला तिच्या आवडतं काम भेटलं होतं ते म्हणजे पोळी भाजी केंद्रात तिला पाहिजेल तसं आणि टाईम पण मॅनेज होईल तसं तिला काम भेटलं होतं ती खूप खुश होती आणि रात्री पण खूप आई आजी सोबत आमच्या सोबत बोलत बसली होती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारीला सकाळी आई सहा वाजता उठली होती व तिने सर्व नाश्त्याची त्यानंतर तिला कामाला जायची तयारी केली पण तिला असं वाटलं की तिने जरा वेळ झोपावं तर ती झोपली आणि त्यानंतर पप्पांना वाटले की हिला जायचंय तरी अजून मम्मी उठली नाही तर पप्पा तिला उठवायला गेले पण आई उठतच नव्हती आणि नंतर जेव्हा आम्ही तिला उठवायला गेलो तर ती तिचा उजवा काय डायरेक्ट गळून पडला होता आणि खूप घाबरलो होतो काय करायचं काय नाही काही समजत नाही ?

More Chapters